भाजपचे निशिकांत दुबे यांचे विधान स्पॅण्डलस

supreme court

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या बेजबाबदार आणि हास्यास्पद विधानांमुळे कोमेजून जायला भारतीय न्याय व्यवस्था ही काही फुलांसारखी नाजूक नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने दुबे यांच्या वादग्रस्त टिप्पणीचा समाचार घेतला. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली. मात्र ते फेटाळताना दिलेल्या आदेशात न्यायालयाने भाजप खासदाराविरुद्ध कडक ताशेरे ओढले. दुबे यांची न्याय व्यवस्थेविरुद्धची टिप्पणी स्पॅण्डलस असल्याची टीका न्यायालयाने केली. वक्फ कायद्याविरुद्धच्या याचिकांच्या सुनावणीवरून दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध व न्यायमूर्तींविरूद्ध बेजबाबदार टीका केली होती. दुबे यांचे हे वक्तव्य निःसंशयपणे भारतीय न्याय व्यवस्थेला कलंकित करणारे आहे. अत्यंत बेजबाबदारपणे ही विधाने केली गेली.