
हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरमुळे रसातळाला गेलेल्या पाकिस्तानती युद्ध करण्याऱ्या खुमखुमी काही जात नाही. हिंदुस्थानने हवाई हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचे जवळपास 50 ड्रोन आणि क्षेपणास्त्र नेस्तनाबूत केले. तसेच अंदाजे 100 हून अधिक दहशतवादी ठार केले. अशा परिस्थितीत पाकड्यांकडे आता पुढील 2 ते 3 दिवस जातील एवढेच शस्त्रसाठी उरला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानवर भीक मागण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानच्या अर्थखात्याने जगभरातील मित्र राष्ट्रांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
हिंदुस्थानशी युद्धाची दर्पोक्ती करणे पाकिस्तानला महागात पडले आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे. हिंदुस्थान पहिल्या दिवसापासूनच पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेत आहे. अशातच गुरूवारी हिंदुस्थानने पाकिस्तानवर तिसरा वॉटर स्ट्राईक केला असून चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे आज उघडले. त्यामुळे पाकव्याक्त कश्मीरवर पुराचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे शहरांमध्ये दहशत निर्माण झाली. हिंदुस्थानच्या कारवाईच्या भीतीमुळे पाकिस्तानी शेअर बाजारही घाबरला आहे.
गरिबीमुळे भीकेला लागलेल्या शाहबाज शरीफ सरकारने पुन्हा एकदा चीनकडून आयएमएफकडे आर्थिक मदतीची याचना केली. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या कार्यकारी मंडळाची आजच 9 मे रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो . पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 1.3 अब्ज डॉलर्स 36,550 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. त्यामुळे य़ा बैठकीत पाकड्यांची मागणीवर काय निर्णय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.


























































