
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई आणि निफ्टी प्रत्येकी 1 टक्क्याहून अधिक अंकाने घसरला. बीएसई निर्देशांक 880.34 अंकांनी म्हणजेच 1.10 टक्क्यांनी घसरून 79,454.47 वर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 265.80 अंकांनी किंवा 1.10 टक्क्यांनी घसरून 24,008 वर आला.
हॉटेल आणि रिअल इस्टेट कंपन्यांचे शेअर्स 7 टक्क्यांपर्यंत घसरले. इंडियन हॉटेल कंपनी, लेमन ट्री हॉटेल्स, इआयएच, आयटीसी हॉटेल्स, सामही हॉटेल्स, ईआयएच आदींचे शेअर्स 3 ते 7 टक्क्यांपर्यंत खाली आले, तर रिअल इस्टेट क्षेत्रातील डीएलएच मॅक्रोटेक डेव्हलपर्स (लोढा ग्रुप), अनंत राज, गोजरेज प्रॉपर्टीज, प्रेस्टीज इस्टेट आदी कंपन्यांचे शेअर्स इंट्रो डे ट्रेडिंगमध्ये 3 ते 6 टक्के घसरले.
याशिवाय प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स 1300 अंकांपेक्षा जास्त घसरला. मात्र काही तासांनंतर मार्केट सावरायला सुरुवात झाली.



























































