
ऑपरेशन सिंदूर नंतर अडचणीत आलेला पाकिस्तान अखेर एकाकी पडला आहे. अमेरिकाने पाकिस्तानला एकटे पाडले असून आता तरी दहशतवादी गटांना मदत करायचे थांबवा, तुमच्या भांडणात आम्ही पडणार नाही, युद्ध रोखणे आमचे काम नाही असे पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ यांना बजावले आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी वान्स यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे कि, हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर अमेरिका नियंत्रण ठेवू शकत नसला तरी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यास अमेरिका नक्कीच प्रोत्साहित करु शकते. आम्हाला दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये मोठा संघर्ष होण्याची चिंता आहे अमेरिकेला शक्य तितक्या लवकर हा तणाव कमी करायचा आहे, असेही वान्स यांनी म्हटले आहे.