
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली. हिंदुस्थानने हे हल्ले परतवून लावत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात हिंदुस्थानला यश मिळाले. यामुळे चेकाळलेल्या पाकिस्तानने सीमेजवळील गावांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
शनिवारी पहाटे पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सीमेजवळील गावांवर गोळीबार करत तोफगोळे डागले. यातील एक तोफगोळा घरावर आदळल्याने राजौरीचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा आणि त्यांचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. तिघांनाही तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान थापा यांचा मृत्यू झाला, तर दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
राजौरी येथून अतिशय दु:खद बातमी आली आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रशासन सेवेतील एक समर्पित अधिकारी राजकुमार थापा यांना आम्ही गमावला आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यावर होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीलाही उपस्थित होते, अशी माहिती ओमर अब्दुल्ला यांनी दिली.
India Pakistan War – पाकिस्तानी सैन्याची चौकी, ड्रोन लॉन्चपॅड बेचिराख; हिंदुस्थानचा जोरदार पलटवार
आज पाकिस्तानी सैन्याने राजौरी शहराला लक्ष्य करत गोळीबार केला. अधिकाऱ्याच्या निवासस्थानावरही पाकिस्तानने हल्ला केला, यात राजौरीचे अतिरिक्त विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला. यामुळे मला अतिव दु:ख झाले असून दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
Additional District Development Commissioner Raj Kumar Thappa dies in Pakistani shelling in Rajouri, tweets J&K CM Omar Abdullah pic.twitter.com/jgH7PyFvMj
— ANI (@ANI) May 10, 2025