कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आरोपपत्र दाखल

कोरोना काळातील कथित खिचडी वाटप प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

अमोल कीर्तिकर, सूरज चव्हाण, सुजित पाटकर, सुनील ऊर्फ बाळा कदम यांच्यासह आठ जणांविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. खिचडी वाटप योजनेबाबत महापालिकेचे नियम, निकषांबाबत अंधारात ठेवून (करार न करता) स्नेहा पॅटरर्सच्या संजय माळी यांच्याकडून खिचडी बनवून घेतली गेली. चौकशी सुरू झाली तेव्हा बनावट कागदपत्रे पुढे केली गेली, असा दावा आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. या पंत्राटाच्या माध्यमातून 14.54 कोटी रुपये गैरलाभाने कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे.