
मेटाने फेसबुकवरील गुंतवणुकीचा स्पॅम उद्ध्वस्त केला आहे. मेटाने मार्चमध्ये ब्राझील आणि हिंदुस्थानातील युजर्सला टार्गेट करणारे 23 हजारांहून अधिक फेसबुक पेज आणि अकाउंट्स बंद केले आहेत. या अकाउंट्सवरून डीपफेकसारख्या तंत्राचा वापर करून लोकांना फसवले जात होते. या फेसबुक पेजवरून पर्सनल फायनान्सचे पंटेट क्रिएटर्स, क्रिकेटपटू, उद्योगपती आदींचे डीपफेक व्हिडीओ तयार करून लोकांना बनावट गुंतवणूक अॅप आणि जुगाराच्या वेबसाईट्सकडे आकर्षित केले जात होते. मेटाने दिलेल्या माहितीनुसार, स्पॅमर्स लोकांना गुंतवणूक सल्ला देण्याच्या निमित्ताने मेसेजिंग अॅप्सकडे आणि नकली वेबसाईटवर घेऊन जातात. अशा फेसबुक पेज आणि अकाउंटला मेटाने लक्ष्य केले आहे.