युद्धावर पोस्ट लिहिणारा रणवीर अलाहाबादिया वादात

रणवीर अलाहाबादिया पुन्हा वादात सापडला. सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याने पाकिस्तानी लोकांची माफी मागितली. त्यामुळे त्याला नेटकऱयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रणवीरला त्याची चूक लक्षात आल्यानंतर त्याने पोस्ट डिलीट केली. रणवीर अलाहाबादियाने पोस्टमध्ये म्हटले की, प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो, अनेक हिंदुस्तानींप्रमाणे, माझ्या मनातही तुमच्याबद्दल द्वेष नाही. आपल्यापैकी अनेकांना शांती हवी असते. जेव्हा जेव्हा आम्ही कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भेटतो तेव्हा ते प्रेमाने स्वागत करतात. रणवीरने पुढे म्हटलंय, पण तुमचा देश सरकार चालवत नाही, तो तुमच्या लष्कराने आणि तुमच्या गुप्तहेर सेवेने चालवला आहे. हे हिंदुस्थानी लोकांचे पाकिस्तानी लोकांविरुद्धचे युद्ध नाही. हे हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय यांच्यातील युद्ध आहे.