जेजुरीच्या खंडोबाला एक हजार किलो डाळिंबाची सजावट

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात वैशाख पौर्णिमेनिमित्त एक हजार किलो डाळिंब वापरून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सध्या उन्हाळा तीव्र असल्याने देवांना थंडावा मिळण्यासाठी खंडोबा देवाचे भक्त खंडूनाना जाधव, पुजारी, सेवेकरी आणि मार्तंड देव संस्थान यांच्याकडून ही सजावट करण्यात आली. हिरवीगार पाने, ताजी टवटवीत डाळिंबे यांच्या सजावटीमुळे गाभारा अधिकच खुलून दिसू लागला.