Hair Care- आता केस गळणार नाहीत, होतील लांबसडक घनदाट.. या घरगुती उपायांनी केसांना मिळेल नवसंजीवनी

महिला आणि केस यांचं एक अतूट नातं आहे. सध्याच्या घडीला केसगळतीच्या समस्येला केवळ स्त्रियाच नाही तर पुरषांनाही सामोरं जावं लागत आहे. आपल्या बदलत्या लाईफस्टाईलाच परिणाम आपल्या केसांवर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणूनच आपण मग विविध तेलं आणि नानाविध सिरम वापरतो. परंतु केसगळतीवर इतर कुठलेही उपाय करण्यापेक्षा घरगुती उपाय हे केव्हाही बेस्ट ठरतात. म्हणुनच केसांची काळजी घेण्यासाठी तेलाचा उपयोग खूप मोलाचा मानला जातो. तेलाच्या जोडीने आपल्या घरातील अगदी सहज उपलब्ध असलेले केसांच्या त्वचेसाठी आवश्यक असणारे पदार्थही खूप महत्त्वाचे आहेत. साधे घरगुती उपाय आपण अमलात आणून केसांचे आरोग्य चांगले ठेऊ शकतो. केसांना सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून आपण  मास्क लावून केसगळती थांबवू शकतो. घरगुती उपाय केसांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडतात.

केसगळतीवर साधे सोपे घरगुती उपाय

केस गळतीवर ऑलिव्ह ऑईल हे फार महत्त्वाची भूमिका बजावते. या तेलामध्ये आपण थोडेसे दही मिसळायला हवे. दही मिसळून हे मिश्रण एकजीव करुन केसांच्या मूळाशी लावावे. मुख्य म्हणजे केस निर्जीव दिसत असतील तर, केसांना चमक आणण्यााशीट ऑलिव्ह तेल सर्वोत्तम पर्याय  आहे.

Hair Care- केसांच्या घनदाट वाढीसाठी ‘या’ तेलाने रोज पाच मिनिटे मालिश करा! केसांची वाढ बघून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल

केस मऊसुत होण्यासाठी तसेच केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी, केळी खूप उपयुक्त मानली जातात. केळी आणि मध केसांसाठी खूप उपयुक्त मानले जाते. खासकरून कोरड्या केसांसाठी केळी आणि मध एकत्र करून केसांना लावावे. हा केसांचा मास्क किमान 15 मिनिटे ठेवावा. मदत होते.

अकाली केस पांढरे होणे ही समस्या अनेकांमध्ये दिसून येते. आवळ्याचा रस, लिंबाचा रस, नारळ तेल समप्रमाणात घ्यावे. या मिश्रणाने केसांच्या मूळाशी मालिश करावी. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध लागतो.

केसांचा चिकटपणा आणि तेलकटपणा घालविण्यासाठी लिंबाचा रस केसांच्या मूळाशी लावावा.  हा रस लावल्यानंतर किमान 15 मिनिटे तसाच ठेवावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावे.

केसांच्या आरोग्यासाठी दही सुद्धा खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये केसांसाठी आवश्यक असणारी खनिजे असतात. तसेच केसांचा कोरडेपणाही दह्याच्या वापराने दूर होतो. अंघोळ करण्याआधी केसांना किमान 10 मिनिटे दही लावून ठेवावे.

केसगळती रोखण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे लिंबू. एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. आंघोळीच्या आधी हे लिंबाचे मिश्रण केसांमध्ये व्यवस्थित लावा. त्यानंतर केस  20 ते 25 मिनिटांनंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

 

(वरील कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)