Miss World 2025- हैदराबादमध्ये 72 व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेला सुरुवात, पाकिस्तानमधून मात्र या स्पर्धेत कुणीच नाही

 

 

72 वी मिस वर्ल्ड 2025 हैदराबादमध्ये नुकतीच सुरु झालेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी 11 मे रोजी या सौंदर्य स्पर्धेचे उद्घाटन केले. परंतु सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व राजस्थानमधील कोटा येथील नंदिनी गुप्ता करत आहे.

 

 

पाकिस्तानातील मात्र कोणीही या स्पर्धेत भाग घेतलेला नाही. 72 व्या मिस वर्ल्ड 2025 सौंदर्य स्पर्धेमध्ये 110 देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा स्पर्धक नसल्याने, प्रेक्षक यांचा संबंध सध्याच्या तणाव असल्याचे समजत आहेत. परंतु असे नसून, पाकिस्तानकडून कोणाचाही सहभाग सध्या सुरू असलेल्या वादाशी संबंधित नाही. दरम्यान, मिस वर्ल्डची अधिकृत प्रचारक, अल्टेअर मीडियाची अश्विनी शुक्ला यांनीही यावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या,
पाकिस्तानने कधीही मिस वर्ल्डमध्ये भाग घेतलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तान क्वचितच दिसतो, बऱ्याचदा ते त्यात सहभागी नसतात. 2023 मध्ये 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एरिका रॉबिनने मिस युनिव्हर्स स्पर्धेत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. यामुळे पाकिस्तानात तिच्यावर अनेकांनी टिकाही केली होती.

हिंदुस्थानकडून नंदिनी गुप्ता देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. नंदिनी प्रोजेक्ट एकता द्वारे अपंग लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे काम करते. या प्रोजेक्टबद्दल बोलताना, नंदिनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की त्याला यासाठी प्रेरणा त्याच्या काकांकडून मिळाली, जे पोलिओशी झुंज देत आहेत. ती पुढे म्हणाले की, आपण असे जग निर्माण केले आहे ज्यामध्ये अपंगांना समाविष्ट केले गेले नाही आणि मला वाटते की, ही चूक सुधारण्यासाठी बराच वेळ लागला आहे. 31 मेला या सोहळ्याचा अंतिम सामना रंगणार आहे.