Virat Kohli Retires : सचिनचे विक्रम मोडण्याचे स्वप्न अधुरेच

विराट कोहलीने आपल्या 75 व्या कसोटीत (पर्थ कसोटी, 2018) आपल्या कसोटी शतकांचा रौप्य महोत्सव साजरा केला होता. विराटच्या धावांचा आणि शतकांचा वेग पाहाता तोच सचिन तेंडुलकरच्या 15,921 धावा आणि 51 कसोटी शतकांचा विक्रम मोडेल, असे सारेच छातीठोकपणे सांगत होते. पण त्यानंतर विराटच्या फलंदाजीला अशी नजर लागली की तो पुन्हा सुरात येऊच शकला नाही.
75 व्या कसोटीत 25 शतकांसह त्याच्या खात्यात 6508 धावा जमा झाल्या होत्या. गेल्या तीन कॅलेंडर वर्षात त्याने हजार धावांचा टप्पा गाठण्याचाही पराक्रम केला होता. एवढेच नव्हे तर 14 शतकेही त्याच्या बॅटमधून झळकली होती.  पण त्यानंतर जे काही घडले ते अनपेक्षित होते.  विराट सातत्याने संघात कायम होता. कर्णधार म्हणून तो नवनवे विक्रमही रचत होता. मात्र त्याचवेळी एक फलंदाज म्हणून तो एकेका शतकासाठी धडपडत होता. त्याने या काळात कर्णधार म्हणून सर्वात यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत खूप वरचे स्थान पटकावले. पण फलंदाज म्हणून त्याची सुरू असलेली घसरगुंडी थांबलीच नाही.
गेल्या सहा वर्षांत विराटला फार मोठी कामगिरी करताच आली नाही. त्याने गेल्या सहा वर्षांत 48 कसोटी सामने खेळला आणि त्याला आपल्या कसोटी धावांमध्ये फक्त 3278 धावांची भर घालता आली. शतकांच्या बाबतीत बोलायचे तर त्याला केवळ 5 शतकेच करता आली. या अत्यंत खराब कामगिरीमुळे तो स्वतःच्या नजरेतूनच पडत चालला होता. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याला खूप काही करायचे होते. पहिल्या पर्थ कसोटीत त्याने शतक झळकावून त्याची झलकही दाखवली, पण त्यानंतर तो त्याच्या फलंदाजीने निव्वळ निराशाच केली. त्याला आपल्या फलंदाजीला न्यायच देता येत नसल्यामुळे त्याने अखेर कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेतला. सर्वात दुःखद म्हणजे तो 10 हजार धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. खुद्द सचिनलाही विश्वास होता की, आपले कसोटी विक्रम विराट कोहलीच मोडेल, पण आता ते कधीच होऊ शकणार नाही.

सचिनला आठवला स्वतःचा निरोपाचा सामना

विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर विश्वविक्रमादित्य व त्याचा संघसहकारी राहिलेल्या सचिन तेंडुलकरनेही एक पोस्ट लिहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.  आपली पोस्ट लिहिताना सचिन म्हणतो, ‘विराट तू कसोटीतून निवृत्त होत आहेस. यादरम्यान तुझ्या 12 वर्षांपूर्वीच्या कृतीची आठवण करून देतो. माझ्या निरोपाच्या कसोटीत तू मला तुझ्या दिवंगत वडिलांनी दिलेला धागा भेट म्हणून दिला होतास. तू दिलेली ती भेट स्वीकारताना माझ्या फार जिवावर आलं होतं, मात्र तुझी ती कृती हृदयस्पर्शी होती. तो भावनेचा धागा आजही माझ्यासोबत कायम आहे. भले मी तुला त्याबदल्यात कोणताही धागा दिला नसेल, पण माझ्या खूप साऱया शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी असतील. तू नव्या पिढीतील असंख्य क्रिकेटपटूंना प्रेरीत केलं.  तुझी कसोटी कारकीर्द भन्नाट होती. तू फक्त टीम इंडियासाठी धावाच केलेल्या नाहीस, तर क्रिकेटला नव्या पिढीचा मोठा प्रेक्षक वर्गही मिळवून दिलास. तुझ्या या विशेष कसोटी कारकीर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा,’ अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने आपल्या भावनांना वाट करून दिली.

अवघ्या 18 महिन्यांत सहा द्विशतके

  • विराट कोहलीला कसोटी कारकीर्दीत दहा हजार धावांचा टप्पा गाठता आला नसला तरी त्याने अवघ्या 18 महिन्यांत सहा द्विशतके साजरी केली होती. त्याचा हा विक्रम मोडणे भविष्यात कोणत्याही फलंदाजासाठी अवघड आव्हान असेल. त्याने जुलै 2016 पासून डिसेंबर 2018 पर्यंत 200, 211, 235, 204, 213, 243 अशा द्विशतकी खेळी केल्या.
  • कसोटी इतिहासात सलग दोन पॅलेंडर वर्षात (2016 आणि 2017) 75 पेक्षा अधिक सरासरीने एक हजार धावा करणारा क्रिकेट विश्वातील एकमेव फलंदाज.
  • कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक 5864 धावा केल्या. यात 20 शतकांचा समावेश. हा विक्रम मोडणेही कठीण.
  • सलग चार कसोटी मालिकेत (2016-17) द्विशतके झळकावणारा पहिला फलंदाज.
  • ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक सात शतके ठोकणारा एकमेव हिंदुस्थानी फलंदाज.
  • हिंदुस्थानचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार. 68 कसोटी सामन्यांपैकी 40 कसोटींत त्याने हिंदुस्थानला विजय मिळवून दिला.
  • ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत कसोटी मालिकेत नमवणारा पहिला आशियाई कर्णधार. 2018-19 मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली पराक्रम केला.

कोहलीची कसोटी कारकीर्द

सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी चेंडू 100 50 0 चौकार षटकार
123 210 13 9230 254* 46.85 16608 30 31 15 1027 30

मायदेश-परदेशातील कोहलीचा कसोटी पराक्रम

सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी 100 50 0 चौकार षटकार
मायदेशात 55 87 9 4336 254ङ 55.58 14 13 7 474 16
परदेशात 66 119 4 4774 200 41.51 16 18 8 543 14
तटस्थ 2 4 0 120 49 30.00 0 0 0 10 0
कॅलेंडर वर्षातील कोहलीची कामगिरी
वर्ष सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी 100 50 0 चौकार षटकार
2011 5 9 0 202 63 22.44 0 2 2 15 2
2012 9 16 2 689 116 49.21 3 3 0 89 2
2013 8 12 1 616 119 56.00 2 3 0 73 2
2014 10 20 1 847 169 44.57 4 2 2 101 2
2015 9 15 0 640 147 42.66 2 2 0 74 1
2016 12 18 2 1215 235 75.93 4 2 0 134 2
2017 10 16 2 1059 243 75.64 5 1 2 97 6
2018 13 24 0 1322 153 55.08 5 5 2 144 2
2019 8 11 2 612 254* 68.00 2 2 2 78 3
2020 3 6 0 116 74 19.33 0 1 0 15 0
2021 11 19 0 536 72 28.21 0 4 4 60 1
2022 6 11 1 265 79 26.50 0 1 0 33 1
2023 8 12 0 671 186 55.91 2 2 0 70 1
2024 10 19 2 417 100* 24.52 1 1 1 43 5
2025 1 2 0 23 17 11.50 0 0 0 1 0
प्रत्येक कसोटी संघाविरुद्धचा कारनामा
विरुद्ध देश सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी 100 50 0 चौकार षटकार
ऑस्ट्रेलिया 30 53 2 2232 186 43.76 9 5 3 242 7
बांगलादेश 8 13 2 536 204 48.72 2 0 1 59 2
इंग्लंड 28 50 3 1991 235 42.36 5 9 6 235 2
न्यूझीलंड 14 27 2 959 211 38.36 3 4 2 116 4
सा. आफ्रिका 16 28 2 1408 254* 54.15 3 5 0 184 6
श्रीलंका 11 18 2 1085 243 67.81 5 2 1 99 6
वेस्ट इंडीज 16 21 0 1019 200 48.52 3 6 2 92 3

कर्णधार आणि बिगर कर्णधार म्हणून कामगिरी

सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी चेंडू 100 50 0 चौकार षटकार
कर्णधार 68 113 6 5864 254* 54.80 57.56 20 18 10 646 17
बि. कर्णधार 55 97 7 3366 186 37.40 52.41 10 13 5 381 13