
अग्निवीर योजनेचे प्रणेते आणि माजी संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांची यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2027 पर्यंत ते या पदावर राहणार आहेत. याबाबतची अधिसूचना 14 मे रोजी जारी करण्यात आली. दरम्यान, 1985 च्या केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले डॉ. अजय कुमार हे 2022 मध्ये संरक्षण सचिव म्हणून निवृत्त झाले होते.