
पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्स अकाऊंट, आरडी किंवा एफडी अकाऊंट असणाऱ्यांसाठी पोस्ट खात्याने विशेष सेवा सुरू केली आहे. आता कुणालाही व्याज प्रमाणपत्र (इंटरेस्ट सर्टिफिकेट) मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. कारण ही सुविधा आता काही मिनिटांत घरबसल्या मिळणार आहे. पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलवरून ग्राहक आता थेट ऑनलाईन इंटरेस्ट सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकतात. ही सुविधा सुरू झाल्यामुळे विशेषतः वरिष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग आणि टॅक्स फाइल करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंटरेस्ट सर्टिफिकेटचा उपयोग आयकर रिटर्न फाईल करताना केला जातो.