
मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील खटले तत्काळ निकाली काढण्यासाठी विविध राज्यांमध्ये पोक्सो न्यायालये उभारा असे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने दिले आहेत. तामीळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने पोक्सो खटले प्रलंबित असून मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणीचे 300 प्रलंबित खटले निकाली काढा, असे निर्देशही सर्वेच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि बी. पी. वराळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पोक्सोअंतर्गत खटले निकाली काढण्यासाठी डेडलाईन पाळली जात नसून हे खटले लवकरात लवकर निकाली काढणे गरजेचे असल्याचे खंडपीठ म्हणाले.