
‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ जमान्यातील लोकप्रिय अभिनेते गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना कान्स फेस्टिव्हलमध्ये अनोखी मानवंदना देण्यात आली. गुरुदत्त यांचे ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहब बीबी और गुलाम’ यासारखे अनेक चित्रपट रिस्टोर करण्यात आले आहेत. या चित्रपटांच्या रिस्टोर व्हर्जनचे अनावरण कान्समध्ये झाले.
गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे जतन, संवर्धन करण्यासाठी अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेन्मेंटने पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारे गुरुदत्त यांना अनोखी आदरांजली वाहण्यात येत आहे. गुरुदत्त यांच्या चित्रपटांवर आधारित विशेष स्टॉलदेखील प्रदर्शनात आहे, असे अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेन्मेंट ग्रुपचे सीओओ, संचालक रजत अग्रवाल यांनी सांगितले. हिंदुस्थानात जुलैपासून गुरुदत्त यांचे रिस्टोर सिनेमा प्रदर्शित होतील. याशिवाय विविध प्रदर्शने व चर्चासत्र होतील.




























































