
नात्याला काळिमा फासण्याची संतापजनक घटना मालवणी परिसरात घडली. आईसमोरच तिच्या प्रियकराने बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर बालिकेचा मृत्यू झाला. मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून बालिकेची आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली. बालिकेची आईचे मालवणीतील एका पुरुषाशी लैंगिक संबंध होते. रविवारी हा पुरुष तिच्या घरी आला असता तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर मुलीशीही लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. आणि महिलेसमोरच तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केला.