घटस्पोटाचा खटला बारामतीतून वांद्रे कोर्टात केला वर्ग

divorce

घटस्पोटाचा खटला बारामतीतून वांद्रे कोर्टात वर्ग करण्याची मागणी मान्य करत उच्च न्यायालयाने एका पत्नीला दिलासा दिला.

या जोडप्याचा विवाह 29 ऑक्टोबर 2020 रोजी झाला. सतत वाद होत असल्याने या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पतीने बारामती नगर दिवाणी न्यायालयात घटस्पोटासाठी याचिका दाखल केली. पतीच्या जाचाला कंटाळून पत्नी मुंबईत आईवडिलांकडे राहायला गेली. त्यामुळे तिला बारामतीतील खटल्याला जाणे अडचणीचे होत होते. घटस्पोटाचा खटला बारामतीतून वांद्रे कुटुंब न्यायालयात वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका पत्नीने केली. न्या. एन. आर. जमादार यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.