डोसियर बनवतोय आणि खासदारांचं शिष्टमंडळ विदेशात पाठवतोय, पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत?; काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

सरकारच्या निशाण्यावर चीन, पाकिस्तान असले पाहिजे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडा, ते अजूनही मोकाट आहेत, असे म्हणत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पाकिस्तानला ऑक्सिजन कोणी दिला? चीनने पाकिस्तानला ऑक्सिजन दिला आहे. चीनच्या मदतीशिवाय पाकिस्तान युद्ध लढू शकत नाही अन्यथा आपल्याला आणखी मोठं यश मिळालं असतं. पण चीन-पाकिस्तानची जोडगोळी आड आली. पाकिस्तानवर आम्ही सवाल उपस्थित केले आहेत, असे जयराम रमेश म्हणाले. काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपने केलेल्या टिकेला जयराम रमेश यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी पाकिस्तानला ऑक्सिजन देत आहेत, अशी टीका भाजपने केली होती. त्यावर जयराम रमेश यांनी भाजप आणि सरकारला सवाल केले.

पाकिस्तानला क्लीन चिट कोणी दिली? जिन्नांना क्लीन चिट कोणी दिली? लालकृष्ण अडवाणी यांनी दिली. जिन्नांची स्तुती कोणी केली? जसवंत सिंह यांनी केली. जिन्ना महान नेते होते, असे जसवंत सिंह म्हणाले होते. लाहोर बस सेवा कोणी सुरू केली? अटलबिहारी वाजपेयींनी सुरू केली होती. नवाज शरीफ यांच्याकडे ब्रेकफास्टला कोण गेलं होतं? नरेंद्र मोदी गेले होते. आंबे कोणी पाठवले? शॉल कोणी पाठवली? नरेंद्र मोदी यांनी पाठवली होती ना. निशाण-ए-पाकिस्तान कोणाला मिळालं? मोरारजी देसाई यांना मिळालं. मोरारजी देसाई यांचे नेते आहेत. जेव्हा ते पंतप्रधान होते त्यावेळी परराष्ट्र मंत्री अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी माहिती आणि प्रसारण मंत्री होते, अशा शब्दांत जयराम रमेश यांनी भाजपसह केंद्र सरकारला धोरेवर धरलं.

गरीबांच्या बँक खात्यात पैसे टाकणे हेच काँग्रेसचे मॉडेल

केंद्र सरकारच्या निशाण्यावर चीन, पाकिस्तान असले पाहिजे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडा. 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यातील सर्व दहशतवादी मारले गेले आणि एकाला पकडण्यात आलं होतं. फक्त काही दिवसांत आणि त्याने हिंदुस्थानला जागतिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळाला. आता काय स्थिती आहे? आपण डोसियर तयार करतोय आणि दहशतवादी मोकाट आहेत. डोसियर बनवतोय आणि खासदारांचे शिष्टमंडळ विदेशात पाठवतोय. पण दहशतवाद्यांना अजूनही पकडलेलं नाही. त्या दहशतवाद्यांना पकडा, चौकशी करा. पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी कुठे आहेत? एक महिना होत आला. अजूनही त्या दहशतवाद्यांना पाकडलेलं नाही. हा खरा मुद्दा आहे, असे म्हणत जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

माझं पाकिस्तानात लग्न लावून द्या, ज्योती मल्होत्राची ISI अधिकाऱ्याकडे मागणी