
रेल्वेने नवीन स्वरेल अॅप लाँच केले असून या अॅपमुळे प्रवाशांना आता तिकीट बुकिंग ते ट्रेनची स्थिती एकाच ठिकाणी मिळवता येईल. हे अॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिम (सीआरआयएस) ने डेव्हलप केले आहे. या अॅपवर विविध डिजिटल सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार असल्याने प्रवाशांना वेगळे अॅप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही. या अॅपमध्ये आरक्षित तिकीट बुकिंग, पीएनआर स्टेट्स, फूड ऑर्डर, फाइल रिफंड, प्लॅटफॉर्म तिकीट, ट्रेन लाइव्ह स्टेट्स, कोच पोझिशन, रेल्वे हेल्पलाइन, फीडबँक यांसारखे फिचर्स मिळणार आहेत. हे अॅप अँड्रॉइड युजर्स गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतील.