
कैलास मानसरोवर यात्रा 30 जूनपासून सुरू होणार आहे. या यात्रेसाठी कम्प्युटर ड्रॉने 750 भाविकांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिलीय. या वर्षी पैलास मानसरोवर यात्रेसाठी एपूण 5561 अर्ज आले आहेत. ज्यात 4024 पुरुष आणि 1537 महिला आहेत. निवड झालेल्या भाविकांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे सूचना देण्यात आली आहे. अधिपृत वेबसाईट किंवा हेल्पलाईन क्रमांक 011-23088133 वर का@ल करूनसुद्धा यात्रेसंबंधी माहिती जाणून घेता येईल. कोविड-19 मुळे 2020 पासून ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर चीन आणि हिंदुस्थान देशांतील संबंध तणावाचे झाल्याने ही यात्रा थांबवण्यात आली होती.