
शिवसेना नेते, दक्षिण–मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांच्या प्रयत्नाने तहसीलदार कुर्ला (मुलुंड) यांच्या विशेष सहकार्याने विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांसाठी विशेष दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विभाग क्रमांक 9 चे विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयात तर सर्वसामान्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक दाखले लागतात. या दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वेळ आणि पैसा करूनही हे दाखले वेळेवर मिळतील याची शक्यता कमी असते. त्या पार्श्वभूमीवर एकाच छताखाली एकाच वेळी उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीय अधिवास दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे मिळावीत यासाठी विशेष दाखले शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना शाखेत अर्ज उपलब्ध असून ते आवश्यक त्या कागदपत्रांसह भरून सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे, अर्जदारांनी केवळ सरकारी शुल्क कर्मचाऱयांना द्यावी, अधिक माहितीसाठी शिवसेना शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजनाची ठिकाणे
1) सोमवार, 26 मे रोजी आणिक गाव, पालिका मराठी शाळा, शंकर देऊळ, आर. सी. मार्ग
2) मंगळवार, 27 मे रोजी मुंबई पब्लिक स्कूल, गोवंडी स्थानक शाळा संकुल, मुंबई -88
3) बुधवार, 28 मे रोजी विघ्नहर्ता मित्र मंडळ सभागृह, समर्थनगर, शिवसेना शाखे शेजारी, सुमननगर, चेंबूर.