कान्सच्या रेड कार्पेटवरून ऐश्वर्या राय बच्चनने दिला ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश, सोशल मीडियावर चर्चा

cannes-2025-aishwarya-rai-operation-sindoor-message-social-media-reaction (1)

Ivory साडी, गळ्यात माणिक आणि भांगेत ‘सिंदूर’ हिंदुस्थानची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) या वर्षीच्या कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes 2025) रेड कार्पेटवर पाहायला मिळाली. तिच्या सिंदूर लूक मधून जगाला स्पष्ट संदेश मिळाला. 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल (Operation Sindoor) बोलण्यासाठी हिंदुस्थान 33 देशांमध्ये आपले प्रतिनिधीमंडळ पाठवणार आहे. भांगेमध्ये ठळक सिंदूर भरून ऐश्वर्या राय बच्चनने कान्समध्ये हिंदुस्थानची सांस्कृतिक राजदूत म्हणून भूमिका बजावली.

खरं तर सिंदूरने एकाच वेळी दोन गोष्टींबाबत स्पष्ट संदेश दिल्याचे बोलले जात आहे. पहिला ऑपरेशन सिंदूर तर दुसरा संदेश म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या वैवाहिक जीवन उत्तम चालले असल्याचा संदेश.

ऐश्वर्याचा कान्स लूक प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने तयार केला होता. हातमागावर तयार झालेली कडवा बनारसी हँडलूमची ही Ivory साडी आणि त्यामुळे अधिक ठळक आणि उठून दिसणारा भांगेतली सिंदूर हे यंदाचे वैशिष्ट्य होते. त्यासोबतच 500 कॅरेटपेक्षा जास्तीचे माणिक, 18 कॅरेटचे सोने आणि हिरे असलेले दागिने परिधान केले होते. त्यासोबतच,बोटामध्ये खास रिंग होती.

Photo : Indian Queen Of Cannes… पाहा ऐश्वर्याचा जबरदस्त लूक

कान्समध्ये नेहमी हजेरी लावणाऱ्या ऐश्वर्याने चाहत्यांना देवदास थ्रोबॅकने थक्क करून सोडलं. 2002 मध्ये संजय लीला भन्साळींच्या देवदास चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्याने फ्रेंच रिव्हिएरामध्ये अशी साडी परिधान केली होती.

देवदास थ्रोबॅक असला तरी ठळक दिसणारा तिचा सिंदूर हाच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

#cannes, #aishwaryarai, #operationsindoor, #socialmedia