यूट्यूबर महिन्याला कमावतो 427 कोटी

मिस्टर बीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले अमेरिकेतील यूट्यूबर जिमी डोनाल्डसन महिन्याला तब्बल 427 कोटी रुपये कमावत असल्याचे समोर आले आहे. जिमी यांचा नुकताच अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला असून अवघ्या 27 व्या वर्षी जिमी यांची संपत्ती 8 हजार 500 कोटी रुपये झाली आहे. मिस्टर बीस्ट यांनी वयाच्या 13 व्या वर्षी ‘मिस्टरबीस्ट6000’ नावाचे एक यूट्यूब चॅनल सुरू केले होते. 2017 मध्ये एक लाख व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मिस्टरबीस्ट यांचे नशीब बदलले.

मिस्टर बीस्ट यांनी चॉकलेट ब्रँड आणि लंच लाँच केले आहे. मिस्टर बीस्ट यूट्यूबवरील सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांच्या यूट्यूबला 396 दशलक्ष सब्सक्रायबर्स आहेत. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि इन्स्टाग्रामवर 500 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. सेलिब्रिटी नेटवर्थनुसार, मिस्टर बीस्ट हे जगातील 8 वे सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत.

सर्व संपत्ती दान करणार ः मिस्टर बीस्ट यांची संपत्ती 8 हजार कोटींहून अधिक आहे, परंतु मरण्यापूर्वी मी माझी सर्व संपत्ती दान करेल, असे मिस्टर बीस्ट यांनी म्हटले आहे. माझे ध्येय पैसे कमावणे आहे, परंतु मरण्यापूर्वी कमावलेला सर्व पैसा मी दान करणार आहे. जगात जे श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांनीसुद्धा इतरांना आर्थिक मदत करायला हवी, असेही मिस्टर बीस्ट यांनी म्हटले.