हे माझंच खातं होतं; छगन भुजबळांकडे पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी

chhagan bhujbal nashik guardian minister statement

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागली. त्यानंतर छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते दिले जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. अखेर याबाबत शासकीय आदेश काढण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आले आहे. असे असले तरी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे नाशिकच पालकमंत्री कोण होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Nashik- ‘आपला जन्म नाशिकचा…’ म्हणत पालकमंत्री पदासंदर्भात छगन भुजबळ यांचं मोठं विधान

‘ताबडतोब चार्ज घेणार’

नोटिफिकेशन निघालं, हे मला आत्ताच कळलं. मी मुंबईला जातोय आणि ताबडतोब चार्ज घेणार आहे. आमचे मुख्य अधिकारी, सचिव या सगळ्यांची बैठकही घेत आहे. त्यांचे काय प्रश्न आहेत? यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal – छगन भुजबळ यांच्या दाव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

माझा प्राधान्यक्रम हाच आहे की माझ्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे. कोरोना काळातही दोन वर्षे ज्यावेळी सगळे लोक घरात बसले होते, त्यावेळी मी शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक दुकानात अन्य धान्य पोहोचवलं. कुठेही तक्रार येऊ दिली नाही. रात्रंदिवस आमच्या विभागाने काम केलं. आता सुद्धा आमचं हेच ध्येय आहे की, एक तर पुढे घोटाळा होता कामा नये. दुसरं संपूर्ण गोरगरिबांना चांगल्या प्रतीचे अन्नधान्य मिळावं. जिथे कुठे राज्यात मागास भटके असतील, त्यांना रेशन कार्ड तात्काळ पुरवणे आणि धान्य वाटप करणार आहे. शिवभोजनच्या काही तक्रारी असतील तर, त्या सोडवाव्या लागतील. हे माझंच खातं होतं, माझा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने ते धनंजय मुंडे यांच्याकडे गेलं. आता धनंजय मुंडे यांना लांब राहावे लागले. आता पुन्हा माझ्याकडे हे खातं आलं आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.