
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन [email protected]
‘मेक इन इंडिया’ धोरणामुळे संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता वाढली आहे. आता भारत स्वतःच्या गरजांसाठी मोठय़ा प्रमाणात स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांवर अवलंबून राहू शकतो, ज्यामुळे आयात खर्चात बचत झाली आहे आणि वेळेवर शस्त्र उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये स्वदेशी शस्त्रांनी दाखवलेली प्रभावी कामगिरी ही या धोरणाची यशोगाथा आहे.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य केले नाही,तर संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे जागतिक प्रदर्शनही केले. हे ऑपरेशन केवळ सामरिक यशाचे प्रतीक नव्हते, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानावर असलेल्या आत्मविश्वासाचेही प्रतीक ठरले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये निवडक आणि अचूक लक्ष्ये ठरवण्यात आली. यात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांसोबत त्या इमारतींचा समावेश होता, जिथे दहशतवादी वास्तव्यास होते. 1971 नंतर प्रथमच भारताने केवळ पाकव्याप्त कश्मीरपुरता मर्यादित न राहता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावरही हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये भारतीय बनावटीच्या ‘ब्रह्मोस’ या क्षेपणास्त्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. ही क्षेपणास्त्रs अचूक लक्ष्यभेदनासाठी प्रसिद्ध असून या मोहिमेत त्यांची प्रभावी कामगिरी दिसून आली.
पूर्वी भारतात 60-70 टक्के शस्त्रास्त्रे आयात केली जात असत. मात्र आता 70-80 टक्के शस्त्रास्त्रs भारतातच बनवली जात आहेत. याशिवाय पूर्वी 25-30 टक्के दारूगोळा परदेशातून आयात केला जात असे, पण आज 100 टक्के दारूगोळा भारतातच तयार केला जातो.
स्वदेशी शस्त्रनिर्मितीमुळे भारतीय पंपन्यांना मोठय़ा प्रमाणावर संधी मिळाल्या आहेत, ज्यामुळे रोजगार निर्मिती होत आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेगही वाढत आहे हे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे मोठे यश आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेले सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्याची मारक क्षमता 400-500 किलोमीटर आहे आणि वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास तीनपट अधिक आहे. प्रगत नेव्हिगेशन प्रणाली आणि उच्च अचूकतेमुळे (सीईपी एक मीटरपेक्षा कमी) हे शत्रूच्या महत्त्वाच्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ब्रह्मोसचा वापर शत्रूची उच्च मूल्याची मालमत्ता लक्ष्य करण्यासाठी यशस्वीरीत्या करण्यात आला. पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर तळावरून आणि हवाई पातळीवरून (land & air-launched variants) या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला गेला आणि त्याच्या अचूकतेमुळे शत्रूला प्रतिसाद देण्याची संधीच मिळत नाही. या क्षेपणास्त्राचा वापर करताना भारतीय हवाई दल आणि लष्कराचे समन्वयाचे कौशल्य दिसून आले. ही एक नवीन पिढीची स्वदेशी बनावटीची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही प्रणाली मध्यम पल्ल्याच्या हवाई लक्ष्यांचा (लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन इत्यादी) सामना करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. ‘आकाशतीर’मध्ये मल्टि-फंक्शन रडार आणि नेटवर्कपेंद्रित युद्ध क्षमता आहे, ज्यामुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर लक्ष ठेवणे आणि हल्ला करणे शक्य होते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये या प्रणालीने शत्रूचे हवाई हल्ले प्रभावीपणे परतवून लावले आणि हवाई क्षेत्रात भारताची श्रेष्ठता स्थापित केली. या प्रणालीचा युद्धक्षेत्रातील पहिला वापर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येच झाला, ज्यामुळे तिची प्रत्यक्ष युद्ध क्षमतेची चाचणी झाली आणि ती यशस्वी ठरली.
या दोन्ही प्रणाली पूर्णतः भारतात तयार होतात. ‘आकाश’ मिसाईल 30 कि.मी. अंतरावरील लक्ष्यांना पाडू शकते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये या प्रणालींनी शत्रूच्या 95 टक्क्यांपेक्षा जास्त ड्रोन लक्ष्यांचा नाश केला. हे भारताच्या स्वदेशी क्षमतांचे मोठे यश आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय बनावटीचे सर्वेक्षण ड्रोन्स आणि अॅटॅक ड्रोन्स यांचा फार मोठा वाटा होता. हे ड्रोन्स नुसतेच लक्ष्य शोधण्यास मदत करत नव्हते, तर त्यांनी प्रत्यक्ष हल्ल्यात भाग घेतला. भारतात विकसित केलेले ड्रोन्स, जसे की TAPAS-BH, SWITCH आणि ARCHER, यांचा वापर लक्षात घेण्यासारखा होता. या सर्व ड्रोन्सचे नियंत्रण भारतीय नेटवर्कसेंट्रिक वॉरफेअर प्रणालीशी संलग्न होते, जे भारताच्या AI आणि डेटाड्रिव्हन युद्ध सज्जतेचे दर्शन घडवते.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने भारताने जगासमोर स्पष्ट केले की, आता तो संरक्षण क्षेत्रात आयातदार नव्हे, तर निर्यातदार देश बनत आहे. अनेक MSME आणि स्टार्टअप पंपन्या संरक्षण क्षेत्रात प्रवेश करत आहेत, ज्यामुळे रोजगार वाढत आहे आणि आर्थिक प्रगतीला गती मिळते आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मधील BDA रिपोर्टस् स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या प्रभावाची साक्ष देतात. स्वदेशी बनावटीच्या ब्रह्मोस आणि इतर अचूक मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमुळे शत्रूच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर अत्यंत कमी वेळेत आणि अचूकपणे हल्ले करण्यात आले. त्यामुळे शत्रूच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आणि त्यांच्या युद्ध लढण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाला. BDA रिपोर्टस्नुसार, 90 टक्क्यांपेक्षा जास्त लक्ष्ये पहिल्या प्रयत्नातच भेदली गेली, ज्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाची अचूकता सिद्ध झाली.
‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ एका हल्ल्याची कथा नव्हती. ती होती भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञान, रणनीती आणि सामरिक आत्मनिर्भरतेच्या यशाची कहाणी. भारतीय लष्कर, हवाई दल, संरक्षण संशोधन संस्था (DRDO) आणि खासगी पंपन्यांचा मेळ या यशामागे होता. हे यश भविष्यातील युद्धांसाठी भारताची तयारी किती सक्षम आहे, हे दाखवणारे ठरते.
‘मेक इन इंडिया’ धोरणामुळे संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता वाढली आहे. आता भारत स्वतःच्या गरजांसाठी मोठय़ा प्रमाणात स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांवर अवलंबून राहू शकतो, ज्यामुळे आयात खर्चात बचत झाली आहे आणि वेळेवर शस्त्रs उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये स्वदेशी शस्त्रांनी दाखवलेली प्रभावी कामगिरी ही या धोरणाची यशोगाथा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील यशानंतर भारताने जागतिक मंचावर आपली संरक्षण उत्पादन क्षमता आणि आत्मनिर्भरता अधिक प्रभावीपणे दर्शविली आहे. त्यामुळे इतर देश भारताकडे एक विश्वासार्ह संरक्षण भागीदार म्हणून पाहू लागले आहेत.