उत्तर प्रदेशात सर्वाधिक अपघात

उत्तर प्रदेशात या वर्षी विक्रमी अपघातांची नोंद झाली आहे. 1 जानेवारी 2025 ते 20 मे या कालावधीत 13,000 हून अधिक रस्ते अपघात झाले असून जवळपास 7,700 मृत्यू झाले. दुपार आणि संध्याकाळच्या वेळेत प्रवास करणे सर्वात धोकादायक असल्याचे एका विश्लेषणातून आढळून आले आहे. उत्तर प्रदेश रस्ते सुरक्षा आणि जागरूकता कक्षाने विविध माहितींच्या आधारे डेटा गोळा करून लोकांना अपघातांची माहिती दिली. सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2024 मध्ये उत्तर प्रदेशात 46,052 रस्ते अपघात झाले, ज्यात 24,118 लोकांचा मृत्यू झाला.