
पावसाळ्यात केस भिजल्यानंतर ते पटकन सुकत नाहीत. त्यामुळे केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात डोकं वर काढते. केसगळतीची समस्या केवळ स्त्रियांपुरती मर्यादीत नाही. तर केसगळतीमुळे पुरुषही त्रस्त आहेत. पावसाळ्यात केस लवकर सुकले जात नाहीत, त्यामुळे केसगळती वाढू लागते. अशावेळी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेले तेल केसांना लावण्याचेही अनेक फायदे आहेत. अशीच एक रेसिपी म्हणजे मेथीचे दाणे आणि नारळाचे तेल. हे मिश्रण केसांमध्ये जादुई फरक आणते आणि केसांना आणि टाळूला पोषण देते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, पावसाळ्यामध्ये मेथी दाणे आणि खोबरेल तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होते. तसेच केसगळतीही मोठ्या प्रमाणात कमी होते.
केसगळती कमी होण्यासाठी तेल
2 चमचे मेथीचे दाणे आणि मूठभर कढीपत्ता 100 मिली नारळाच्या तेलात 10-15 मिनिटे उकळवा. नंतर हे तेल थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तेल गाळून बाटलीत भरा. शॅम्पू करण्यापूर्वी या तेलाने मसाज करा.
केसांचा कोरडेपणा कमी होतो
केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी नारळाचे तेल आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवलेले तेल लावू शकता. यामुळे उत्तम पोषण मिळते. पोषण मिळाल्याने केस मऊ आणि रेशमी होतात आणि केसांची ताकदही वाढते.
केसांची वाढ होण्यासाठी
नारळाच्या तेलात लॉरिक अॅसिड असते, यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. त्याचप्रमाणे मेथीमध्ये आढळणारे प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड सारखे घटकांमुळे केसांची वाढ होते.





























































