हनीमून संपला! मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ,बिग ब्युटीफुल बिलावरून बिनसले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती टेस्लाचे सीईओ, उद्योजक एलन मस्क यांनी विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ आता पूर्ण झाला आहे, असे म्हणत राजीनामा दिला आहे. डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी या विभागाचा कार्यभार ट्रम्प यांनी मस्क यांच्याकडे दिला होता. वायफळ खर्च टाळण्याचे काम या विभागाचे होते. बिग ब्युटीफुल विधेयकावरून बिनसल्याने त्यांनी ट्रम्प यांची साथ सोडली.