
सौदी अरबमध्ये हज यात्रेसाठी विनापरवानगी पोहोचलेल्या 2 लाख 69 हजार मुस्लिमांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी हज यात्रेवेळी चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे या वर्षी सौदी सरकारने कडक नियम जारी केले आहेत. आतापर्यंत सौदीत 14 लाख मुस्लिम पोहोचले आहेत. विनापरवानगी येणाऱ्या व्यक्तीला 5 हजार अमेरिकन डॉलर दंड आणि अन्य कारवाई करण्यात येईल, असा इशारा सौदी सरकारने दिला आहे.