कॅनरा बँकेचा ग्राहकांना दिलासा

बचत खाते, एनआरआय बचत खाते आणि सॅलरी खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट कॅनरा बँकेने रद्द केली आहे. कॅनरा बॅकेच्या या निर्णयामुळे लाखो खातेधारकांना याचा फायदा मिळणार आहे. बँकेने हा नियम 1 जून 2025 पासून लागू केला आहे. त्यामुळे मिनिमम बॅलन्स नसलेल्या खात्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कॅनरा बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला असला तरी अन्य बँकांकडून मिनिमम बॅलन्स नसलेल्या खातेधारकांवर दंड आकारला जात आहे.