कारागृहातील आरोपीकडे IPS जालिंदर सुपेकरांनी 300 कोटी मागितले! भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप

वैष्णवी हागवणे आत्महत्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघला आहे. या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू झाली आहे. सामाजिक आणि राजकीय वातावरण या घटनेमुळे ढवळून निघले असताना या घटनेशी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे कनेक्शन लावले जात असताना बीडचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप केला आहे. जेलमध्ये असलेल्या आरोपीकडे जालिंदर सुपेकर यांनी 300 कोटी रूपये मागितल्याचे त्यांनी म्हटल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील वैष्णवी हागवणे यांनी सासरच्या मंडळीकडून होणार्‍या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघले आहे. या घटनेशी संबंधित पोलीस अधिकारी आणि आरोपींवर राजकीय वर्तुळातूनही आरोप होत आहे.हागवणे कुटुंबाचे नातेवाईक असणारे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हे सध्या हॉटशिटवर आहेत. त्यांच्या शिफारशीवरूनच अनेकांना रिव्हॉलव्हर देण्याचे काम झाले आहे. जालिंदर सुपेकर यांच्यावर विविध स्तरातून आरोप केले जात असताना भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी जेलमध्ये असणार्‍या आरोपीकडून 300 कोटी रूपयाची मागणी केली आहे अशी तक्रारही माझ्यापर्यंत पोहचली आहे. नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागणे म्हणजे नैतिकतेचा पूर्णपणे र्‍हास झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर यापूर्वीच कारवाई करत त्यांची बदली करण्यात आली आहे. ते सध्या उपमहासमाजदेशक होमगार्ड या कनिष्ठ पदावर नियुक्त आहेत.

जालिंदर सुपेकरांचं ‘आका’शी कनेक्शन

आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांच्याकडून प्रत्येक जेलमध्ये पैशांची मागणी केली जाते. बीडच्या कारागृहात असणार्‍या वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात ठेवण्यात जालिंदर सुपेकर यांची महत्वाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

IPS Jalinder Supekar Demanded ₹300 Crore from Jail Inmate, Alleges BJP MLA Suresh Dhas