
कोलंबियामध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. बोगोटा येथे एका प्रचार सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी 15 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.
Colombian presidential candidate Miguel Uribe shot in Bogota
Read @ANI Story | https://t.co/VEQhQamPJ6#Bogota #MiguelUribe #Colombia pic.twitter.com/O8bqpt4Asa
— ANI Digital (@ani_digital) June 8, 2025
मिगुएल उरीबे हे डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. शनिवारी बोगोटा येथे एका उद्यानामध्ये आयोजित प्रचारसभेला संबोधित करत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. जवळून झाडलेली गोळी त्यांच्या पाठीत आणि डोक्यात घुसली. यानंतर उरीबे हे रक्तबंबाळ अवस्थेत मंचावर कोसळले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Colombian presidential candidate Miguel Uribe Turbay shot in the head in Bogotá’s Modelia neighborhood, Fontibón, during a campaign event. Attacked by unknown gunman, he’s in critical condition. #Colombia_shooting pic.twitter.com/9ZOfRR9qfF
— GeoTechWar (@geotechwar) June 8, 2025
दरम्यान, अचानक झालेल्या या गोळीबारामुळे सभास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. उरीबे यांच्या अंगरक्षकांनी तात्काळ त्यांना सावरले आणि हल्लेखोराच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीदरम्यान काही नागरीकही जखमी झाले.
15 वर्षांच्या मुलाला अटक
बोगोटाचे महापौर कार्लोस गालान यांनी उरीबे यांच्यावर हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेला हल्लेखोर फक्त 15 वर्षांचा असून त्याने हे कृत्य का केले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे उरीबे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.