
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पत्रकार जीवन तांबे यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मंगळवार 10 जूनला देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह व 75 हजार रुपये रोख असे परितोषिकाचे स्वरूप असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. त्यांनी समाजकार्यासह वसतिगृहातील समस्या, विद्यार्थ्यांच्या अडचणींवर आवाज उठवला आहे. तांबे हे गेली 15 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात असून शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, बेघर रहिवाशांच्या समस्या अशा विविध विषयांना त्यांनी वाचा फोडली आहे.