सावता सेना संघटनेच्या मुंबई अध्यक्षपदी चित्रा परंडवाल यांची नियुक्ती

सामाजिक कार्याची आवड आणि योगदान तसेच संघटन कार्यातील दीर्घ अनुभव याची दखल घेत नवी मुंबईतील शिक्षिका चित्रा परंडवाल यांची ‘समाज सेवेसाठी समाज संघटन’ हे ब्रीदवाक्य असलेल्या सावता सेना महिला आघाडीच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माळी समाजाच्या हिताच्या व अस्मितेच्या प्रश्नासोबतच समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी चित्रा परंडवाल काम करत राहतील, अशी भावना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे, प्रदेशाध्यक्षा स्वाती गोरे यांनी व्यक्त केली. त्यांच्या नियुक्तीबद्दल संघटनेचे उपाध्यक्ष नितीन परंडवाल, महाराष्ट्र जनसंपर्कप्रमुख तुकाराम सातव यांच्यासह शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.