शोभेच्या फुलातून कोकेनची तस्करी

शोभेची फुले (आर्टिफिशल) आणि कार्डच्या आड कोकेनची तस्करी करणाऱया दोन परदेशी नागरिकांना सीमा शुल्क विभागाने अटक केली. सीमा शुल्क विभागाने कारवाई करून 489 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची किंमत कोटय़वधी रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग तस्करीच्या प्रकाराचा आलेख वाढत चालला आहे. परदेशातील तस्कर हे ड्रग तस्करीसाठी विविध क्लुप्त्या शोधून काढतात. दोन परदेशी प्रवाशी हे कोकेन घेऊन येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. आज ते दोन परदेशी प्रवाशी विमानतळावर आले. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली. त्यांच्या बॅगेत कृत्रिम फुले आणि कार्ड होती. ती फुले आणि कार्डमध्ये कोकेन लपवले होते. एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्या दोघांना अटक केली.