24 तास आधी कन्फर्म होणार रेल्वेचे तिकीट

लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करणाऱया प्रवाशांची तिकीट बुकिगची चिंता दूर होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या हेतूने तिकीट बुकिंग प्रणालीत काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वे प्रवासाची आरक्षण यादी प्रवास सुरू होण्याच्या 24 तास आधी जारी केली जाणार आहे. त्यामुळे तिकीट कन्फर्म झाले की नाही हे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना 24 तास आधीच कळणार आहे. सध्या रेल्वेची आरक्षण यादी ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी जारी केली जाते. दरम्यान, तत्काळ तिकीट बुकिंग व इतर आरक्षण प्रक्रियेत बदल केलेला नाही.