
यजमान इंग्लंड आणि हिंदुस्थान यांच्यातील बहुचर्चित कसोटी क्रिकेट मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘टीम इंडिया’ बेकहॅम मैदानावर कसून सराव करीत आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी इंग्लिश क्युरेटर जॉश मॉर्डेन यांची भेट घेऊन आम्हाला सरावासाठी चांगली खेळपट्टी पाहिजे, अशा सूचना केल्या.
गौतम गंभीर आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ यांनी माझी भेट घेऊन एक बैठक घेतल्याची माहिती स्वतः क्युरेटर जॉश मॉर्डेन यांनी दिली. या बैठकीत गंभीर यांनी चांगल्या खेळपट्टीची मागणी केली आहे. ‘आम्हाला सपाट किंवा अधिक गवत असलेली खेळपट्टी नकोय. पाच दिवस चांगला सराव होईल अशी खेळपट्टी तयार करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे आम्हाला खेळपट्टीत काही बदल करावे लागले. त्यावरील गवत कापावे लागले. त्यानंतर गैतम गंभीर व त्यांच्या सपोर्ट स्टाफने समाधान झाले,’ असे क्युरेटर यांनी सांगितले.