
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 जूनपासून पाच दिवस परदेश दौऱयावर जाणार आहेत. या ‘फॉरेन टूरटूर’मध्ये मोदी कॅनडासह सायप्रस, क्रोएशियाला भेट देतील. मोदी कॅनडातील कनानास्किस येथे होणाऱया जी-7 शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत.
हिंदुस्थान आणि कॅनडामधील तणावपूर्ण संबंधांमुळे मोदी या ठिकाणी होणाऱया जी-7 परिषदेत जाणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांनी मोदींना जी-7 परिषदेचे रीतसर आमंत्रण दिल्याने आता ते कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. यानुसार मोदी 16 आणि 17 जून रोजी होणाऱया जी-7 परिषदेला उपस्थित राहतील.
आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा
- या शिखर परिषदेत मोदी जी-7 देशांचे नेते, इतर निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण कल्पना, विशेषतः एआय-ऊर्जा संबंध आणि नव्या तंत्रज्ञानावर चर्चा करतील.
- मोदींच्या दौऱयामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.