तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप व डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.