
ताडदेवच्या एका इमारतीमधील दोन बंद घरांचे लॉक तोडून 430 ग्रॅम सोन्याची चोरी झाली होती. आरोपींनी शिताफीने घरफोडी करून मुंबईतून पलायन केले होते. मात्र गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने अचूक तपास करीत दोघा चोरांना रतलाम रेल्वे स्थानकातून उचलले.
ताडदेवच्या साने गुरुजी मार्गावरील रहिमतबा इमारत क्रमांक 1 मधील दोन खोल्या बंद होत्या. हीच संधी साधत चोरांनी त्या दोन्ही खोल्यांना टार्गेट केले. त्यांनी पद्धतीशीर कट रचून त्या दोन्ही बंद खोल्यांचे लॉक तोडले आणि एकूण 413 ग्रॅम वजनाचे सोने चोरून नेले. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने समांतर तपास सुरू केला. प्रभारी निरीक्षक सदानंद येरेकर, सपोनि अमोल माळी व पथकाने तांत्रिक बाबी व खबऱ्यांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत असताना गुन्हा करणारे दोन्ही आरोपी हे परप्रांतीय आहेत.