
घरगुती वादातून पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा गावात घडली. या प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पत्नीला अटक केली आहे. वैशाली दुर्वास चौधरी (32) असे आरोपी पत्नीचे तर दुर्वास बाबुराव चौधरी (35) असे मयत पतीचे नाव आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलीस निरीक्षक करत आहेत.
पती-पत्नीमध्ये घरगुती कारणातून वाद झाला. या वादातून वैशालीने रागाच्या भरात दुर्वास यांची रुमालाने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.