पत्नीसाठी काय पण…! ‘ताजमहल’सारखे घर

मध्य प्रदेशातील बुरहानपूरमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी खास अगदी ताजमहालसारखे हुबेहूब दिसणारे आलिशान घर बांधले आहे. सोशल मीडियावर या अनोख्या घराचे नेटीजन्स कौतुक करत आहेत. आनंद प्रकाश चौकसे आणि त्यांच्या पत्नीचे स्वप्न होते की त्यांचे घर ताजमहलसारखे दिसावे. हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे. घरात सुंदर संगमरवरी घुमट, कोरीव खांब आणि कमानीदार दरवाजे आहेत. हे आलिशान घर एका शाळेच्या आवारात बांधले आहे, या शाळेची सुरुवात आनंद प्रकाश चौकसे यांनी स्वतः केली होती.