
कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिह्यातील दांदेली नगरातील एका घरात नोटांची बंडले सापडली. या घरात 500 रुपयांच्या नोटांचा ढीगच पडलेला होता. रिकाम्या बॉक्समध्ये सुद्धा नोटांची बंडले दिसत होती. कॉटवर मोठ्या प्रमाणात नोटा होत्या. यामुळे एकच खळबळ उडाली. पण या खऱ्या नोटा नव्हत्या. चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रॉप्स म्हणून वापरण्यात आलेल्या नकली नोटा होत्या. शूटिंगविषयी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. मग येथे या नोटा आल्या कशा? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलिसांनी तेथील भाडेकरूला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.