
ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा 2’ या कन्नड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना होता होता टळली. शूटिंगच्या वेळी क्रू मेंबर्सची बोट उलटली. ऋषभ शेट्टीसह 30 जणांना वाचवण्यात आले. शिवमोगा जिह्यातील मणि जलाशयात शूटिंग सुरू असताना हा अपघात घडला. कॅमेरा आणि अन्य मशीन पाण्यात बुडाल्या. गेल्या काही दिवसांपासून ‘कांतारा 2’च्या बाबतीत अपघात सत्र सुरूच आहे. गुरुवारी 43 वर्षीय मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन निजूचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गेल्या महिन्यात प्रोडक्शन टीमच्या 3 कलाकारांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला होता.