
पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असतो. काहींना पावसात भिजायला आवडते, तर काहींना खिडकीतून पावसाच्या सरी अनुभवायला आवडतात, परंतु पावसाळ्यात हिंदुस्थानी घरांमध्ये सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे पावसाळ्यात चहासोबत भजींचा आस्वाद घेणे. पावसाळ्यात कुरकुरीत भजी बनवले तर ते मजेदार असते. तुम्हीही अनेकदा पावसाळ्यात कांदा भजी आणि समोसा बनवले असतील. परंतु तुम्हाला या पावसाळ्यात काहीतरी नवीन करून पहावयाचे असेल तर हे स्नॅक्स नक्की करुन बघा.
कुरकुरीत चीज बॉल्स
कुटुंबातील मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना ते आवडतील.
सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या.
नंतर ते सोलून घ्या आणि नंतर मॅश करा.
त्यामध्ये ब्रेडक्रम्ब किंवा पोहे घ्या. जर तुमच्याकडे पोहे असतील तर ते मिक्सरमध्ये बारीक बारीक करा. ते बटाट्यांमध्ये घाला आणि त्यात काळी मिरी, कुस्करलेली लाल मिरची, मीठ, आले, लसूण पेस्ट किंवा पावडर घाला.
कोथिंबीर घाला आणि सर्वकाही मिक्स करा. नंतर मिक्सरमध्ये मोझरेला चीज घाला आणि त्या मिश्रणाचे गोळे बनवा. त्यानंतर एका भांड्यात कॉर्न फ्लोअर, मैदा, थोडे मीठ आणि काळी मिरी घालून बॅटर बनवा. त्यात गोळे कोट करा आणि नंतर ब्रेडक्रंबमध्ये कोट करा आणि ते तळून घ्या. चीज बाॅल्स तयार आहेत.
कुरकुरीत कॉर्न टिक्की
पावसाळ्यात आपण कुरकुरीत स्नॅक्सबद्दल बोललो तर तुम्ही कॉर्न टिक्की बनवू शकता.
बटाटे आणि स्वीट कॉर्न उकडून घ्यावे.
बटाटे मॅश करा आणि त्यात उकडलेले कॉर्न घाला आणि त्यात हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घाला.
त्यात एक ते दोन चमचे मैदा किंवा कॉर्नफ्लोअर मिक्स करा आणि लहान टिक्की तयार करा. आता या टिक्की एका पॅनमध्ये सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा. हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
चविष्ट पोहे नगेट्स
पावसाळ्यात पोहे छान लागतात, पण त्याला एक मजेदार ट्विस्ट देण्यासाठी, नगेट्स बनवा.
उकडलेल्या मॅश केलेल्या बटाट्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि बेसिक मसाले घाला. त्यानंतर, पाण्यात भिजवलेले पोहे पिळून त्यात घाला. आता पोह्यांचे नगेट्स बनवा आणि नंतर ते सोनेरी होईपर्यंत तळा. आणि गरमागरम सर्व्ह करा.
ब्रेड रोल
अगदी सोपी आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजेच ब्रेड रोल.
सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल घालून हिंग, आलं लसुन आणि मिरची परतवून घ्या त्यानंतर त्यामध्ये हळद, धणे वडर, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथींबीर आणि कुस्करलेले उकडलेले बटाटे घालून परतवून घ्या.
नंतर मिश्रण थंड करुन घ्या . त्यानंतर ब्रेडच्या बाजूच्या कडा काढून ब्रेड थोडा पाण्यात भिजवून त्यामध्ये बटाट्याचे सारण घाला आणि पुर्ण व्यवस्थित रोल करून घ्या. आणि हे रोल मंद आचेवर खरपूस तळून घ्या. आणि गरमागरम सर्व्ह करा.































































