
गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातानंतर, बरीच खबरदारी घेतली जात आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट रद्द करण्यात आली आहे कारण त्यात टेकऑफपूर्वी बिघाड झाला होता. विमान अपघातानंतर पहिल्यांदाच एअर इंडियाचे फ्लाईट (AI-159) लंडनला जाणार होते, परंतु उड्डाणापूर्वी त्याची तपासणी करण्यात आली आणि त्यात तांत्रिक बिघाड आढळून आला आणि नंतर ते उड्डाण रद्द करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार टेक-ऑफपूर्वी फ्लाइटमध्ये बिघाड आढळून आला. त्यानंतर फ्लाइट रद्द करण्यात आली. फ्लाइट रद्द झाल्यामुळे, प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. या फ्लाइटमधील बहुतेक लोक राजकोट, आनंद, हलोल, खंभात येथील प्रवासी आहेत.
फ्लाइट रद्द करण्याबाबत प्रवाशांनी सांगितले की एअर इंडियाच्या टीमने सांगितले की, फ्लाइट रद्द करण्यात आली आहे. विमानाला आता AI 171 ऐवजी AI 159 हा क्रमांक देण्यात आला आहे. हे विमान आज (17 जून) दुपारी 1.10 वाजता उड्डाण करणार होते. परंतु सकाळपासूनच उड्डाण उशिराने सुरू झाले होते. तथापि, आता एका बिघाडामुळे हे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारी अहमदाबादमधील मेघानीनगर येथे झालेल्या विमान अपघातानंतर, एअर इंडियाच्या विमानांमध्ये सतत बिघाड होत आहेत.