ब्लेज मेट्रेवेली गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी

ब्लेज मेट्रेवेली यांची ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच एक महिला गुप्तचर संस्थेचे नेतृत्व करणार आहे. ब्लेज मेटेवेली सध्या एम16 मध्ये टेक्नोलॉजी आणि इनोव्हेशन विभागाच्या महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्या आता रिचर्ड मूर यांची जागा घेणार आहेत. रिचर्ड मूर यांनी पाच वर्षे एजन्सीचे प्रमुख म्हणून काम केले आहे. ब्लेज मेटेवेली या गुप्तचर अधिकारी म्हणून बऱयाच काळापासून कार्यरत आहेत. लवकरच त्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारतील. त्या थेट परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांना रिपोर्ट करतील.