
भारतीय जनता पक्षातील एका नेत्याचा अश्लील व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. महामार्गावर एका महिलेसोबत शरीरसंबंध ठेवतानाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकारण तापले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता पंजाबच्या मंत्र्यांचा बेडवरील एक खासगी फोटो समोर आला आहे. यात मंत्री ड़ॉ. रवजोत सिंह बिट्टू हे एका अर्धनग्न महिलेसोबत दिसत आहेत. शिरोमली अकाल दलचे नेते बिक्रम सिंग मजीठिया यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामुळे पंजाबचे राजकारण ढवळून निघाले आहे.
बिक्रम सिंह मजीठिया यांनी मंगळवारी रात्री आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून चार फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आम आदमी पार्टी सरकारमधील एका मंत्र्याचे असल्याचा दावाही त्यांनी केला असून या प्रकरणाला त्यांनी ‘सेल्फीकांड’ असे नाव दिले.
आप सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा कारनामा. बहिणी-मुलींच्या अब्रुसोबत खेळणाऱ्या या वासनांधाला सरकार आणि पक्षातूनही बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. हा मानवेवर कलंक आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. आधी त्यांनी पंजाबीमध्ये ही पोस्ट शेअर केली आणि काही वेळाने इंग्रजीत केली. यात त्यांनी आपल्याकडे याचा व्हिडीओही असून तो लवकरच सार्वजनिक करेल, असेही म्हटले.
👉 AAP unmasked again!
After Balkar Singh & @LC_Kataruchak, now Minister Dr.Ravjot Singh caught in #SelfieKand — accused of violating women’s dignity.
Where are AAP’s ethics now?
Morality in AAP is long dead.
A predator in power is a threat to every daughter of Punjab.
If…— Bikram Singh Majithia (@bsmajithia) June 17, 2025
ते फोटो पत्नीसोबतचे, मंत्र्याचे स्पष्टीकरण
आपच्या मंत्र्याचे खासगी फोटो व्हायरल झाल्यानंतर पंजाबचे राजकारण तापले. मंत्री रवजोत सिंग बिट्टू यांनीही याबाबत सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत विरोधी पक्षाने एआयच्या मदतीने फोटो एडिट केल्याचा आरोप केला. लुधियानतील पोटनिवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने विजय मिळवल्याने ताबा सुटलेले विरोधी पक्षाचे नेते एआयच्या मदतीने माझे पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबतचे खासगी फोटो एडिट करून व्हायरल करत आहेत. त्यांचे हे कृत्य अत्यंत लाजिरवाणे असून महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहेत, असे रवजोत सिंह बिट्टू यांनी म्हटले. तसेच आपण दलित समाजातून आल्याने आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लुधियाना उपचुनाव में AAP की शानदार जीत होते देख विपक्ष इतना बौखला गया है कि उसके नेताओं ने नीचता की सारी हदें पार कर दी हैं। इनके कुछ नेता मेरी पूर्व पत्नी के साथ मेरी निजी तस्वीरों को AI के सहारे एडिट कर सोशल मीडिया पर फैला रहे हैं।
इन्होंने मुझे निशाना इसलिए बनाया है क्योंकि…— Ravjot Singh (@DrRavjotOffice) June 17, 2025
तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दरम्यान, रवजोत सिंह बिट्टू यांनी एक पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला. हा फोटो पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबतचा असून 8-10 वर्षांपूर्वीच आमचा घटस्फोट झाल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी आपण चार वेळा लग्न केल्याचेही सांगितले. मात्र हा माझा वैयक्तिक विषय असल्याचेही ते म्हणाले. तसेच या प्रकरणी रवजोत सिंह बिट्टू यांनी शिरोमली अकाल दलचे नेते बिक्रम सिंग मजीठिया यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मजीठिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.