Fathers Day ‘बाबा विसरत नाहीत’ फिल्ममधून मांडला वडिलांच्या वचनपूर्तीचा भावनिक प्रवास

Papa hai na

वडील हे नेहमीच कुटुंबाचे अबोल, धीरोदात्त आधारस्तंभ असतात. साऱ्या कुटुंबाला ताकद, स्थैर्य आणि अतूट समर्पण देतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांचा तोल अखंड सांभाळतात आणि आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी आणि भविष्यासाठी नेहमीच प्राधान्य देतात. या फादर्स डे निमित्त एसबीआय लाईफ इनश्युरन्स आपल्या बाबा आहेत ना #PapaHainNa डिजिटल मालिकेअंतर्गत ‘बाब विसरत नाहीत’ ही हृदयस्पर्शी डिव्हीसीसादर करत आहेत. वडिलांच्या शांतचित्त ताकद आणि चिरकालीन, कायमस्वरूपी वचनांचे प्रतिबिंब यात आहे. दररोजच्या प्रेम, शिस्त आणि चिकाटीने भरलेल्या क्षणांतून प्रेरणा घेतलेली ही फिल्म म्हणजे अनेक भूमिका पार पाडत असतानाही आपल्या प्रियजनांना दिलेली वचने कधीच न विसरणाऱ्या वडिलांना केलेला सलाम आहे.

या कथानकाची सुरुवात तीन वडिलांच्या व्यावसायिक आयुष्यातून होते — एक हॉकी प्रशिक्षक, एक वन अधिकारी आणि एक आर्किटेक्ट. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात आत्मविश्वासाने नेतृत्व करत असतात. स्ट्रायकरला सूचना देणे असो, रेंजर्सना समजावून सांगणे किंवा रस्त्याच्या साइटचे परीक्षण करणे असो. तेच या संगळ्याच्या केंद्रस्थानी असतात. त्यांचे हातच सर्वांना दिशा, शिस्त आणि निर्धार दर्शवतात.

फिल्ममध्ये एका अखंड, सुंदरमॅच कटद्वारेतेच हात ऑफिसमधून घरात पोहोचल्यावर बाळाला कुशीत घेणे, खेळण्यातली जादूची काठी फिरवणे, बिल्डिंग ब्लॉक्सचा मनोरा कौतुकाने पाहणे या गोष्टी करायला लागतात. हा विरोधाभास सूक्ष्म पण प्रभावशाली आहे: जे वडील अधिकाराने आदेश देतात, तेच प्रेमाने संगोपनही करतात. आपल्या अतूट समर्पणातून ते किती सहजतेने विविध भूमिका पार पाडतात हे या बदलातून दाखवलं आहे. फिल्मचा शेवट एका रंगीबेरंगी मोजॅकद्वारे होतो. जिथे डॉक्टर, शेतकरी, अग्निवीर, शिक्षक असे विविध क्षेत्रात काम करणारे वडील केवळ त्यांच्या कामाच्या ठिकाणीच नाही तर त्यांच्या सगळ्यात अर्थपूर्ण भूमिकेत दाखवले जातात: ‘वडील’ म्हणून. त्यातला संदेश अगदी स्पष्ट आहे — ‘जे आपली उद्दिष्ट आणि आपल्या माणसांना दिलेली वचनं कधीच विसरत नाहीत… ते बाबा आहेत ना.’

डिजिटल फिल्मच्या सादरीकरणाबाबत बोलताना एसबीआय लाईफ इनश्युरन्सचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सीएसआरचे चीफ ऑफ ब्रँड श्री. रवींद्र शर्माम्हणाले, ‘वडील हे आपल्या आयुष्यातले स्थिरचित्त, नि:स्वार्थी आणि खोलवर समर्पितशांत पण अखंड पाठीशी असलेले आधार असतात. ते कदाचित नेहमी आपली भावना व्यक्त करत नाहीत, पण आपल्या प्रियजनांना दिलेली वचने कधीच विसरत नाहीत. ‘बाबा विसरत नाहीत’ ही एसबीआय लाईफच्या #PapaHainNa डिजिटल मालिकेअंतर्गत सादर केलेली आमची नवी फिल्म म्हणजे घरातल्या या शांत पण प्रभावशाली शक्तीला सलाम आहे. वडील नेहमीच अतूट समर्पित भावनेतून जबाबदाऱ्या आणि नातेसंबंध यांचा समतोल ठेवत आपले जीवन जगतात. एसबीआय लाईफमध्ये, आम्ही उद्दिष्टपूर्ण जीवन जगण्यावर विश्वास ठेवतो. फक्त स्वतःसाठी नव्हे, तर ज्यांचं आपल्यालेखी खरोखरच महत्त्व आहे अशा सर्वांसाठी. या DVC द्वारे, आम्ही हेतू, प्रेम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेसह प्रत्येक क्षण जगत ‘अपने लिए, अपनोंके लिए’ हे आमच्या ब्रँडच्या तत्वज्ञानाचं मूर्तिमंत प्रतीक असलेल्या सर्व वडिलांना सलाम करतो’.